साहित्यिक

नाना रेखी कोण होते ज्यांनी स्वामींची कुंडली लिहली.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. स्वामीभक्तांनो अहमदनगरमधील नाना रेखी हि व्यक्ती त्या काळातील ज्योतिषी होते ते स्वामीभक्त देखील होते. नाना रेखी हे स्वामींच्या सांगण्यावरून अक्कलकोटास आलेले होते. नाना रेखी ज्योतिष विद्येत पारंगत होते त्यांना घुबडाची भाषा देखील परिचित होती, म्हणूनच ते पिंगळा ज्योतिष म्हणून देखील ओळखले जात होते.

एकदा नाना रेखी मुंबई ला गेले असता त्यांना संत स्वामी सुतांना भेटण्याचा बहुमान मिळाला, स्वामी सूतांनी त्यांना श्री स्वामी समर्थांची कुंडली बनवण्यास सांगितली होती स्वामी सूतांकडून माहिती घेऊन नाना रेखी ह्यांनी स्वामींची कुंडली बनवली. स्वामी सूतांनी हि कुंडली नाना रेखींना स्वामी चरणी स्वहस्ते अर्पण करण्यास सांगितली, त्यानंतर मात्र नाना रेखी त्यांना अक्कलकोट मध्ये जाण्याची तीव्र इच्छा झाली त्यानंतर ते आपल्या पत्नीसोबत ते अक्कलकोटास गेले.

अक्कलकोटला गेल्यानंतर त्यावेळी श्री स्वामी समर्थ महाराज हे एका दर्ग्यावर बसले होते. त्यांना पाहून नाना रेखी व त्यांची पत्नी श्री स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले व त्याचवेळी नानांची पत्नी सखू ह्यांना त्यांच्या भूतकाळातील आठवण झाली आणि तिच्या भूतकाळात स्वामींनी तिला बालयोगींच्या रूपाने तिला दर्शन देऊन चेलिखेडयाच्या स्तंभातून स्वतःला प्रकट केले हे देखील आठवले. त्यानंतर स्वामींची भेट घेतल्यावर, नाना रेखी ह्यांनी तयार केलेली कुंडली तत्काळ स्वामींच्या चरणी अर्पण केली.

ती कुंडली जेव्हा ते तिथे गेले होते तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम चालू होता. तेव्हा स्वामींनी ती कुंडली एका भक्ताला सांगून ती कुंडली माळावर टाकण्यास सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला तेव्हा ती पुन्हा परत आणण्याची आज्ञा केली कुंडली परत आणली तेव्हा त्यावर हळद, कुंकू, अक्षदा, तुळस, फुले वाहून पूजा करण्यात आली. हि कुडंली स्वामींनी पहिली व ते पाहून ते खूप खुश झाले, ते म्हणाले कि देखता क्या है नौबत बजाओ असा आदेश त्यांनी आपल्या भक्तांना दिला.

त्यानंतर स्वामींनी आपला उजवा हात नाना रेखिंच्या हातावर ठेवला आणि नानांच्या तळहातावर निळ्या रंगात विष्णुपद उमटले, स्वामींचे आत्मलिंग व विष्णुपद हे शेवटपर्यंत त्यांच्या तळहातावर राहिले त्यांतर नाना रेखी ह्यांना वाकसिद्धी मिळाली. अहमदनगरला परत आल्यावर त्यांनी पुन्हा एकदा मठ बांधला त्यानंतर त्यांनी त्यांनी स्वामींच्या पादुकांची त्यात स्थापना केली ह्यावर विद्वान पंडितांनी ह्यावर आक्षेप केला त्यांचा खूप छळ देखील केला मात्र श्री स्वामींच्या कृपेने सर्व विरोध हा नाहीसा झाला.

मित्रांनो हा नाना रेखींनी स्थापन केलेला हा मठ आजदेखील अहमदनगर मध्ये गुज्जर गल्लीत रेखी मठ म्हणून प्रसिद्ध आहे, आजदेखील त्यांचे वंशज त्यांचा हा वारसा सांभाळत आहेत. सण १९१२ रोजी समाधिस्थ झालेले नाना रेखी त्यांनी श्री स्वामी सुताची अभांगगाथा स्वहस्ते लिहून जतन केली त्यांनी केलेल्या स्वामींच्या कुंडलीने ते स्वामी संप्रदायात कायमचे नाव करून गेले. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट