सोमवती अमावस्या का म्हणायचे? सोमवती अमावस्याचे महत्त्व आणि यादिवशी करा हे सोपे उपाय.
धार्मिक

सोमवती अमावस्या का म्हणायचे? सोमवती अमावस्याचे महत्त्व आणि यादिवशी करा हे सोपे उपाय.

अमावस्या दर महिन्यात येत असते. मग महिन्यात येणाऱ्या अमावस्याला सोमवती अमावस्या का म्हणायचे. असा प्रश्न तुम्हा सर्वाना येत असेल. येत्या सोमवारी येणारी अमावस्या सोमवारी आल्यामुळे तिला सोमवती अमावस्या असे म्हणतात. सोमवारी येणाऱ्या समावस्याला खुप मोठे महत्त्व आहे शास्त्रात आणि उपासने मध्ये. या दिवशी जर काही सोपे उपाय केले तर तत्याचे खुप चांगले लाभ आपल्याला मिळतात.

या दिवशी खंडोबाचे भक्त आवर्जून दर्शना साठी जातात. पाल, जेजुरी या ठिकाणी असंख्य भक्त दर्शना साठी जातात. सोमवती अमावस्या दिवशीचे महत्त्व काय आणि या दिवशी श्री शिव शंकराची उपासना कोणती करायची तसेच यादिवशी कोणत्या कोणत्या आराधना आणि उपासना करण्याच्या यबद्दल आपण जाणून घेणार आहोत त्याच सोबत आपण हे सुद्धा जाणून घेऊ या यादिवशी कोणकोणते काम सुरु करायचे आणि कसे सुरु करायचे याबद्दल सुद्धा माहिती जाणून घेऊ.

सोमवारी जी अमावस्या येणार आहे तिची सुरुवात हि रविवारी दुपारी दोन नंतर आहे. तसेच सोमवती अमावस्याची समाप्ती हि सोमवारी सायंकाळी पाच वाजता आहे, सोमवती अमावस्या निमित्य जे काही आराधना करायची आहे. उपासना करायची आहे ती पाच पर्यंतच करायची आहे. मानतील इच्छा उपरणं होत नसतील, व्यवसायात अडचणी येत असतील, घरातील प्रत्येक कार्यात अडचणी येत असतील तर या दिवशी महादेवाची उपासना आणि आराधना करावी.

सकाळी लवकर उठून अंघोळ करून सवच कपडे परिधान करून आपल्या घरा जवळ असलेल्या श्री महादेवाच्या मंदिरात जाऊन आराधना आणि उपासना करावी. महादेवाला पाण्याचा किंवा दुधाचा अभिषेक करावा तसेच बेल पत्र अर्पण करून महादेवाचं जप कमीत कमी एक माळ आणि जर का शक्य असेल तर पाच किंवा अकरा माळ जप करावा. महादेवाचा जप ओम नमो शीवाय नमः मंत्र जप नक्की करावा.

सुख समुद्धी चांगले यश प्राप्त होण्यासाठी आणि चांगले आरोग्य मळावे यासाठी महादेवाची उपासना करताना आपल्या कुलदैवतांची सुद्धा उपासना आराधना आणि नामस्मरण नक्की करावे. ज्या मुला मुलींना लग्न जमण्यासाठी काही अडचणी येत असतील तर या दिवसा पासून ते लग्न जमेपर्यंत रोज एक माळ जप अवश्य करावा.

मुलांच्या कल्याणासाठी पालकानी शिवलेला अध्यातिला पोती मधला अकरावा अध्या नक्की वाचावा. तसेच ज्यांच्या घरात सतत कोणीना कोणी आजारी पडत असतील तर त्या घरात मृत्युंजय मंत्र सतत ऐकावं त्याच सोबत शिव मंत्रपाठ करताना पुरुषांनी ओम नमः शिवाय असा करावा तर स्त्रियांनी शिवाय नमः हा मंत्र पाठ करावा.

ज्या व्यक्तीना सतत आर्थिक अडचणी येत असतात. व्यवसायात प्रगती होत नसेल अशा लोकांनी माता लक्ष्मीचा अष्टकाचा पाठ हा शिव मंत्रपाठ आवर्जून करावा. ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत पितृ दोष आहे अशा व्यक्तीनी पिपळाच्या झाडाला नमस्कार करून अकरा वेळा प्रदक्षणा घालावी तसेच आपले पितृना मुक्ती मिळावी त्यांचे आशीर्वाद मिळावा म्हणून ओम पितृ देवताय नमः असा मंत्र जप एकेविस वेळा करावा

ज्या व्यक्तीचे कुलदैवत खंडोबा आहे अशा व्यक्तीनी श्री नमो मार्तंड भैरवाय हा मंत्र जप अवश्य करावा. ज्या व्यक्तीना महादेवाच्या किंवा खंडोबाच्या मंदिरात जातात आले नाही तर आपल्या घरच्या देवघर समोर बसून हे मंत्र जप केले तरी चालतात. तसेच या दिवशी अन्न दान आणि वस्त्र दान केल्यास त्याचे लाभ खुप मोठे मिळतात.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट