स्वार्थी लोकांपासून सावध रहात जा., या पद्धतीने वावरत चला स्वार्थी आणि मतलबी लोकांसोबत. , With selfish and mean people.
लाईफस्टाईल

या पद्धतीने वागत चला स्वार्थी आणि मतलबी लोकांसोबत.

समाज्यात प्रत्येक प्रकारचे लोक असतात. कोणी समाज्याच्या विचार करतात कोणी स्वतःचा विचार करतात तर कोणी आपले काम साधून इतरांना सुद्धा मदत करतात. पण आशे काही लोक आहेत ते फक्त आणि फक्त स्वतःचा फायदा झाला पाहिजे यचाच विचार करतात आणि इतरांशी त्यांना काही घेणे देणे नसते. अशा लोकांपासून आपण थोडे सावध राहिले पाहिजे.

बरेच लोक नेहमीच बोलत असतात हा व्यक्ती स्वार्थी आहे. हा व्यक्ती मतलबी आहे. पण स्वार्थ म्हणजे नेमके काय हा अर्थ लोकांना लवकर समजत नाही. आणि त्यावर ते बोलत असतात. स्वार्थ म्हणजे ज्या गोष्टी मध्ये आपला आनंद लपलेला असतो याला आपण स्वार्थ असे म्हणतो. पण आपण वरती पहिल्या पमाणे स्वार्थीपणा मध्ये सुद्धा काही प्रकार आहेत.

” नेहमीच स्वार्थी लोकांपासून सावध रहात जा. “

खरे पहिला गेल्यास स्वतःच्या आनंदा साठी दुसऱ्याचा विचार नकरता केलेली गोष्ट म्हणजे स्वार्थी होय. पण स्वार्थी पणाचे सुद्धा काही प्रकार आहेत. काही प्रकार हे समाज्यासाठी किंवा स्वतः साठी चांगले मानले जाते. तीन प्रकारचे लोक समाज्यात असतात. त्यापैकी पहिला प्रकार असा आहे.

पहिल्या प्रकारातील व्यक्ती हे स्वतः आनंदी राहण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि त्याच सोबत आपल्या आजूबाजूला असणारे लोक सुद्धा आनंदी राहिले पाहिजे या कडे सुद्धा तितकेच लक्ष देत असतात. आपल्या आनंदा सोबत त्यांना इतरांना सुद्धा आनंदित ठेवायचे असते असे लोक समाजासाठी सुद्धा आणि इतरांसाठी सध्या खुप चांगले असतात.

दुसऱ्या प्रकारच्या लोक असतात ते स्वतःच्या आनंदासाठी इतरांशी काही देणेघेणे ठेवत नाहीत. स्वतःचे काम, स्वतःचा आनंद यातच त्यांचे विश्व असते. अशा लोकांना आपल्या आजूबाजूचे लोक दुःखी किंवा संकटात असले तरी सुद्ध त्यांच्या कडे लक्ष देत नाहीत. जर एखाद्या व्यक्तीला काही गरज लागत असेल तर त्या कडे साफ दुर्लक्ष करतात.

” काही वेळेस स्वतःचा विचार न करता समाज्याचा विचार आधी करावा. यामुळे समाज परिवर्तनात होण्यास मदत होते “.

तिसऱ्या प्रकारातील स्वार्थी लोक. हे व्यक्ती स्वतःच्या आनंदासाठी कोणतीही किंमत मोजण्यास तयार असतात. असे लोक इतर व्यक्तीला जर का त्रास होत असेल आणि आपल्याला त्या गोष्टी पासून आनंद मिळत असेल तर ते व्यक्ती या कडे लक्ष देत नाही. स्वतःचा आनंद स्वतःचे काम या कडे लक्ष देत असतात. अशा लोकांना समाज्याशी काही घेणेदेणे नसते. आपल्या आनंदा साठी इतरांना त्रास होत असेल तरी सुद्धा त्याचा विचार करत नाहीत

पहिल्या प्रकारातील लोक हे समाज्याचा विचार करतात आपल्या जवळील लोकांना आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करतात असे स्वार्थी लोक नेहमीच चांगले असतात. दुसऱ्या प्रकारातील लोक हे स्वतःचा आनंद ज्यात आहे अशा गोष्टी करत असतात. त्यांना तर व्यक्ती संकटात असेल किंवा दुःखी असेल री सुद्धा त्यांना काही फरक पडत नाही. आणि ते इतरांना सुद्धा त्रास होईल असे वागत नाहीत.

पण शेवटच्या प्रकारच्या व्यक्ती हे समाज्यासाठी चांगले नसतात. त्यांना फक्त स्वतःच्या आनंद कसा मिळवता येईल या कडे जास्त भर असतो. पण अशा वेळी एखाद्या व्यक्तीला जर का त्रास होत असेल. तरी सुद्धा ते त्या कडे लक्ष देत नाहीत. काही वेळेस समोरच्या व्यक्तीला दुःख देऊन आपल्याला आनंद मिळत असेल त्या वेळेस सुद्धा स्वतःचा विचार आधी करणार. अशा लोकांना आपण महास्वार्थि सुद्धा म्हणू शकतो.

” स्वार्थ साधून केलेले काम जास्त काळ आनंद कधीच देत नाहीत. “

त्याच सोबत अशा लोकांना कोणतीच मदत करत जणू नका. कारण हे लोक काम झाले कि तुम्हला विसरून जातात. पुन्हा काम पडल्यास तुम्हला बोलतात अशा लोकांपासून लाब रहात जा. अशा लोकांसोबत जास्त वेळ घालू नका कारण त्यात तुमचा तोडा आहे कारण त्यांना काहीतरी लाभ तुमच्या पासून होणार असेल त्यामुळेच ते तुमच्या सोबत रहात असतात.

अशा महास्वार्थि लोकांपासून सावध रहात जा. नाहीतर तुम्हला मानसिक त्रास तर होणारच शिवाय तुमचे कोणतेच काम पूर्ण होणार तर नाहीच शिवाय तुम्हाला काम करण्याची इच्छा सुद्धा राहणार नाही. आणि त्याचा फायदा पुन्हा हे लोक घेत जातात. त्यामुळे स्वार्थी लोकांपासून सावध रहात जा.

हे पण वाचा:- गूळ खाण्याचे फायदे

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट