Write this one letter on the left hand side.
धार्मिक

हे एक अक्षर डाव्या हातावर लिहा. मनातील कोणतीही इच्छा लगेच पूर्ण होईल.

पंचत्वांचा प्रदर्शित करणारे चिन्ह हे आपल्या डाव्याहाताच्या अनामिक बोटावर काढायचे आहे. या मध्ये हवा, जल पाणी, प्रथ्वी आणि अग्नी यांचा समावेश असतोच त्याच सोबत पातळ लोक, पितृ लोक आणि देव लोक यांचा सुद्धा समावेश या संकेतिक चिन्हा मध्ये आहे. तसेच आपण देव धर्म करतो, उपासना करतो यामधून मिळणारे पुण्य सुद्धा या चिन्हा मध्ये समाविष्ट आहे.

हे चिन्ह कोणत्याही प्रकारचे अक्षर नसून सांकेतिक चिन्ह आहे. बऱ्याच लोकांना असे वाटत असेल कि इंग्रजी, मराठी किंवा संस्कृत मधील अक्षर असेल. असे नसून हे एक संकेतिक चिन्ह आहे. या चिन्ह मध्ये आपली मनोकामना पूर्ण होण्याची शक्ती या यामध्ये असते. हे चिन्ह आपण आपल्या डाव्या हाताच्या अनामिक म्हणजे करंगळी जवळचे बोट यावर काढायचे आहे. तसेच या चिन्ह कडे एक सारखे पहात रहायचे आहे.

चिन्ह कसे काढायचे. त्याचा उपयोग असा करायचा याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. त्या आधी हे चिन्ह आपल्या हातावर काढल्या नंतर या कडे दिवसभरात जसा वेळ मिळेल त्यावेळेस त्याकडे पहायचे आहे. आणि एकच इच्छा त्याकडे पाहून बोलायची आहे. हे चिन्ह काढताना हिरव्या रंगाचा पेन वापरायचा आहे. तसेच हे चिन्ह काढत असताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

ज्या दिवशी आपण हे चिन्ह आल्या हातावर काढणार आहोत त्या वेळेस आपल्या मनात शुभ आणि मंगल विचार असायला हवे. मनात कोणतीही शंका येता कमानये. तसेच कोणाबद्दल वाईट विचार करूनका, कोणाचे वाईट होईल असे वागू नका. तसेच कोणतेही काम आत्मविश्वासाने करा. स्वतःचा आत्मविश्वासा वाढेल अशा गोष्टींचा विचार करा.

त्याच बरोबर रोज देवाचे नामस्मरण करा. देवांच्या लीलेवर दृढ विश्वास ठेवा. तसेच आपल्या आजूबाजूला असलेले वरिष्ठ व्यक्ती यांची सेवा करा. आपण ज्या गुरूंची उपासना करतो त्यांचा जप करत जा. तसेच इतर धार्मिक व्यक्ती, ऋषी, मुनी यांची उपासना व त्यांचा आदर करत जावे. त्यांचा अपमान होईल असे बिलकुल वागूनये. या सर्व नियमांचे आपण योग्य पालन केल्यास या चिन्हा पासून लगेच आपल्याला लाभ नक्की मिळतो.

कशा पद्धतीने चिन्ह काढावे याबद्दल माहिती जाणून घेऊ. एक उभी रेष काढायची आहे. त्यानंतर दोन समांतर आढव्या रेषा काढायच्या आहेत, उजव्या बाजूने. हे चिन्ह इंग्रजी अक्षरा सारखे दिसत असेल तरी ते इंग्रजी अक्षर नाही. यांची नोंद नक्की सर्वानी घ्यावी. तसेच हे संकेतिक चिन्ह अंघोळ झाल्यावर काढायचे आहे. ते ते सुद्धा हिरव्या रंगाच्या पेनने.

हा उपाय आपल्या मनात आल्याशिवाय करू नका. कारण बळजबरीने केलेले काम कधीच पूर्ण होत नाही किंबहुना त्यात यश मिळत नाही मग ते कोणतेही काम असो.

हे पण वाचा :- हनुमान चालिसा पाठ वाचण्याआधी या गोष्टी नक्की जाणून घ्या.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट