धार्मिक

योगिनी एकादशी फक्त ५ तुळशीची पाने इथे ठेवा, कोणतीही इच्छा पूर्ण होईल.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात एकादशीचे महत्वव फार आहे. एक कृष्ण पक्षात येते तर एक शुक्ल पक्षात अश्या पद्धतीने महिन्यातून २ व वर्षातून २४ एकादशी येतात आणि ज्या वर्षी अधिक महिना येतो त्यावेळी त्या महिन्याच्या २ एकादशी मिळून एकूण २६ एकादशी त्या वर्षी येतात.

जेष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला योगिनी एकादशी म्हणतात. या दिवशी श्री हरी विष्णूंचे पूजन व उपासना केली जाते. एकादशीचा दिवस हा श्री हरी विष्णूंना समर्पित केलेला असतो ह्या दिवशी उपवास केला जातो व श्री हरी विष्णू व माता लक्ष्मीचे पूजन केले जाते.

ह्या दिवशी मनोभावे श्री हरी विष्णू व माता लक्ष्मीचे पूजन केल्याने त्यांची कृपा आपल्यावरती बरसते व आपल्या सर्व मनोकामनांची पूर्तता होते. ह्या एकादशीचे असाधारण महत्वव आहे. ह्या एकादशीचे वर्णन करताना श्री कृष्णांनी वर्णिले आहे कि ह्या एकादशीचे व्रत केल्यास ८८ हजार ब्राह्मणांना भोजन दिल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होते.

एकादशी दिवशी तुळस पूजनाचे फार महत्वव आहे. जे व्यक्ती एकादशीचे व्रत करतात व तसेच शालिग्रामचे पूजन करतात श्री हरी विष्णूंच्या कृपेने त्यांची पूर्तता होते. आपल्या आजच्या लेखात आपण तुळशीच्या पानांचा एक उपाय आपण पाहणार आहोत. हा उपाय खूप साधा सोपा पण अत्यंत प्रभावी आहे. ज्या घरात तुळस लावलेली असते, तिथे साक्षात देवी लक्ष्मी व विष्णूंचे निरंतर वास्तव्य असते.

एकादशीच्या दिवशी लवकर उठून स्नान करावे, स्नान करण्याच्या पाण्यात गंगाजल टाकावे व त्या पाण्याने स्नान करावे. त्यानंतर श्री हरी विष्णूंचे व लक्ष्मीचे पूजन करावे शालीग्राम स्वरूप श्री हरी विष्णूंचे देखील पूजन करावे. त्यानंतर योगिनी एकादशीची व्रतकथा ऐकावी किंवा वाचावी.

५ तुळशीची पाने घेऊन ती गंगाजलाने धुवून घ्यावीत व त्यानंतर ती ५ पाने हातात घेऊन आपण आपली जी काही इच्छा किंवा मनोकामना असेल ती आपण मनातल्या मनात बोलून द्याची आहे व नंतर आपण ओम नमो भागवते वासुदेवाय नमः ! ह्या मंत्राचा २१ वेळा जप करावा हा मंत्रजप करताना देखील ती पाने हातातच राहून द्यावीत.

त्यानंतर ती पाने एक एक करून शालीग्राम स्वरूप श्री हरी विष्णूंना अर्पण करावीत. व आपण भगवंतांना मनोभावे नमस्कार करावा. त्यानंतर आपण ११ प्रदिक्षणा तुळशी मातेला घालाव्यात. हा उपाय केल्यास लवकरात लवकर आपली इच्छा जी काही मनोकामना असेल ती पूर्णत्वास जाईल. उपाय खूप साधा व सोपा आहे परंतु हा जर तुम्ही मनोभावे केल्यास आपल्या जीवनातील सर्व कष्ट व बाधांची निवारण भगवंत नक्कीच करतील.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट