नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो आपल्या जीवनात वास्तुशास्त्राचे फार महत्व आहे आपल्या घरात काय ठेवावे काय ठेवू नये घरात कोणती वस्तू कोठे ठेवावी ह्याविषयी संपूर्ण माहिती आपल्याला वास्तुशास्त्रामुळे मिळते. आजच्या लेखात आपण हत्तीविषयी माहिती घेणार आहोत. हत्तीला हिंदू संस्कृतीत खूप शक्तिशाली व पवित्र प्राणी मानले जाते.
हत्ती सर्वात जास्त वर्ष जगतो म्हणून हत्तीला दीर्घायुष्याचे प्रतीक देखील मानले जाते. वास्तुशाश्त्रानुसार घरात हत्तीची मूर्ती ठेवल्याने खूप फायदे होतात. घर असो दुकान असो, ऑफिस, फॅक्टरी प्रेत्येक ठिकाणी हत्ती ठेवणे हे तितकेच लाभदायी मानले जाते. दुकानात हत्ती ठेवताना किंवा घरातदेखील हत्ती ठेवताना तो नेहमी वरती सोंड केलेलाच असावा. त्याचे सकारात्मक परिणाम आपल्याला मिळतात.
धर्मग्रंथानुसार चांदीचा भरीव हत्ती बनवून घरात ठेवल्याने, घरावरील वाईट ग्रहांचा प्रभाव कमी होऊन त्यांचा चांगला परिणाम आपल्या जीवनावर पडतो. परंतु तो हत्ती भरिवच असावा छोटा असला तरी चालेल परंतु तो भरिवच असावा पोकळ असू नये. आपण गणपतीकडे गणपती बाप्पांचे स्वरूप म्हणून देखील पाहतो. घराच्या दारावर वरती सोंड केलेले हत्ती लावल्यास घरात प्रेम व आनंदी वातावरणाची निर्मिती होते.
घरात जर सतत वादविवाद किंवा भांडणतंटे होत असतील तर घरातील वादविवाद व भांडणे मिटवण्यासाठी ३ हत्ती घरात पूर्व दिशेला ठेवावेत. हे ३ हत्ती घरात अश्या ठिकाणी ठेवावेत कि सर्वात मोठा हत्ती पुढे व सर्वात छोटा हत्ती मागे असावा असा उतरत्या हत्तीचा कळप ठेवावा. बेडरूम मध्ये पांढऱ्या हत्तीची मूर्ती ठेवणे खूप शुभ मानले जाते ह्यामुळे पतिपत्नीमधील प्रेम वाढीस लागते.
पूर्वीच्या काळी असे म्हणत असत कि कर्जातून मुक्ती मिळवायची असेल तर खऱ्या हत्तीच्या पोटाखालून निघावे आणि हत्तीच्या पायाखालील माती उचलून ती विहरीत टाकावी ह्या उपयामुळे आपल्यावरील सर्व कर्ज लवकर मिटेल. आपल्या शत्रुदोष खूपच वाढला असेल किंवा शत्रुभय असेल तर शनिवारच्या दिवशी आपण एक अंकुश हत्तीच्या माहुताला दान करावा ह्यामुळे शत्रूच्या भीतीचा नाश होतो आणि आपल्याला होणार त्रास कमी होतो.
देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तसेच पैस्याची आवक वाढवी असे वाटत असेल तर चांदीचा एक भरीव हत्ती आपल्या घरातील तिजोरीत ठेवावा हा हत्ती देखील वरती सोंड केलेला असावा. ह्यामुळे देवी आईची कृपा आपल्यावर बरसते, आपल्या आर्थिक परस्थिती सुधारेल. वरती सोंड केलेला हत्ती आपल्या ऑफिस च्या टेबल वरती ठेवला तर आपल्या कार्यात यश प्राप्ती होते, तसेच आपल्या निर्णय क्षमतेत देखील वाढ होते.
जर चांदीचा हत्ती आपल्याला बनवणे शक्य नसेल तर आपण संगमरवराचा छोटा हत्ती बनवून तो देखील आपण घरात किंवा ऑफिस मध्ये ठेवू शकतो. आपल्या हॉल मध्ये हत्तीची मूर्ती ठेवल्याने शांतात राहते त्याचबरोबर आपल्याला यश प्रदान होते. राहूचा त्रास आपल्याला असेल तर आपण आपल्या खिशात किंवा पाकिटात हत्ती ठेवावा. हयामुळे आपल्याला राहुदोषापासून मुक्ती मिळते तसेच आपल्याला धंद्यात बरकत होते प्रगती होते.
घराच्या उत्तर पूर्वेला चांदीचा हत्ती ठेवल्याने वास्तुशास्त्रीय दृष्ट्या खूप शुभ मानले जाते, ह्यामुळे घरात सुखसमृद्धी येते. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




