your-mind-strong-and-powerful
लाईफस्टाईल

आपले मन मजबूत आणि शक्तिशाली बनवा हे नियम वापरून.

आज या स्पर्धेच्या युगात जर का तुम्हाला टिकणु रहायचे असेल तर मानाने आणि शरीराने मजबूत असणे गरजेचे आहे. जर का आपले मन कमकुवत असल्यास पुढे जाण्यासाठी लागणारी शक्ती कमी पडते. आपल्या मध्ये इच्छा शक्तीची कमतरता जाणवते आणि कोणतेही काम आपण पूर्ण करू शकत नाही. आपले मन कसे मजबूत करायचे या बद्दल काही नियम आहेत ते जाणून घेऊ.

आपले मन मजबूत करण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे लोकांकडून सहानभूती मिळवणे बंद करा. प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे लक्षवेधून घेण्याची सवय असते. प्रत्येकाने आपल्याडे पहिले पाहिजे आपल्या काय झाले आहे याची विचारणा केली पाहिजे. जर का घरात एखादे लहान मूल आजारी असेल तर त्याला आपण जशी सहानभूती देतो तशी सहानभूती घेणे बंद करा.

आपल्याला जर का सहानभूती घेण्याची सवय लागली तर आपण चागले काम केल्यास त्याची अपेक्षा करत असतो. जर का आपल्यला कोणीच सहानभूती दिली नाही तर आपण आपले दुःख इतरांना सागत बसतो आणि त्यांची सहानभूती मिळवण्याचा पर्यंत करत असतो.

दुसरा नियम छोट्या छोट्या कामात दुसऱ्यांची मदत घेणे बंद करा. आपण काही वेळेस खुप छोट्या कामांसाठी इतरांना मदत मागतो. हे शक्यतो टाळा. मदत मागणे चुकीचे नाही पणखुप छोट्या छोट्या गोष्टी साठी मदत मागितली कि आपण इतरांवर अवलंबुन राहत जातो. इतरांवर अबलंबून रहाणे खुप चुकीचे आहे. जितके जास्त दुसऱ्यावर अवलंबून राहू तितके आपण कमकुवत बनत जातो. यामुळे आपली प्रगती सुद्धा होत नाही. जितके शक्य असेल तितके छोटी कामे स्वतः करतजा यामुळे तुमच्यात आत्मविश्वास वाढत जाईल.

तिसरी गोष्ट आपल्या कामात वचनबद्ध रहा. म्हणजे काय तर आपण ठरवलेली कामे पूर्ण करत जा ती मग कोणतीही असो. जर का पण एका दिवसात हि चार कामे करायची आहेत हे ठरवून ठेवा. जो पर्यंत हि कामे पूर्ण होत नाही तोपर्यंत इतर कामाला हात लावू नका. जर का तुम्ही हि कामे पूर्ण केली तर तुमच्यात एक प्रकारची शक्ती निर्माण होते. आणि दुसऱ्या दिवशी नवीन काम करण्याचा आत्मविश्वास आपल्यात आलेला असतो. कोणत्याही परिस्थितीत ठरवलेली कामे पूर्ण करत जात.

चौथी गोष्ट लगेच आनंद मिळणाऱ्या गोष्टी पासून लाभ रहा. आपण नेहमी अशा गोष्टी करत असतो ज्या मुळे आपल्याला आनंद मिळत असतो जसे कि मोबाईल वर तासन तास गेम खेळत बसने. बराच काळ सोशल मीडिया वर वेळ घालवत बसतो. यामुळे आपल्याला जरी लगेच आनंद मिळत असाल तरी त्याचे परिणाम काही दिवसांनी वाईट होतात. अशी कामे तुम्ही करा ज्यामुळे काही दिवसांनी का होईना तुम्हला त्याचा फायदा झाला पाहिजे. जसे कि पुस्तक वाचन करणे, सकाळी लवकर उठून व्यायाम करणे, नवनवीन गोष्टी शिकत जाणे. यामुळे आपली प्रगती नक्की होते आपल्यात आत्मविश्वास वाढतो. ह्या गोष्टी मुळे आपल्याला आनंद उशिरा मिळत असला तरी यामुळे आपले मन शक्तीशाली बनते.

पाचवी गोष्ट स्वतःची कीव करणे बंद करा. आपल्याला होणाऱ्या कोणत्याही त्रासाला दुसऱ्याला दोषी ठरवत बसू नका. प्रत्येक वेळेस माझे नशीब खराब आहे असे बोलत बसू नका. यामुळे आपले मन कमकुवत होत जाते. कारण आपण सतत दुसऱ्याला आणि स्वतःल दोष देत असतो. जर का मनाला मजबूत आणि शक्तिशाली बनवायचे असेल तर प्रत्येक कामाची जबाबदारी घायला शिका. कारण आपल्या मध्ये प्रत्येक समस्या पूर्ण करण्याचे सामर्थ्य आपल्यात आहे.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट