धार्मिक

झोपताना जर आपल्याला वाईट स्वप्ने येत असतील तर ताबडतोब करा हे उपाय…

स्वप्न शास्त्राच्या माध्यमातून स्वप्नांचा अभ्यास तसेच स्वप्न फळाचा विचार देखील केला जातो. झोपेच्या वेळी आपण खूप वेगळी वेगळी स्वप्न पाहत असतो. त्यातील काही स्वप्न शुभ असतात तर काही स्वप्न अशुभ गोष्टींचा संकेत देतात.खूप वेळा आपण झोपलेले असताना भयानक स्वप्न पडले असताना आपण अचानक जागे होतो.

  • अग्निपुराणानुसार, जर एखादा व्यक्ती जर वाईट स्वप्न पाहताना जागा झाला असेल तर असा व्यक्तीने लगेचच झोपावे. असे केल्यामुळे ते स्वप्न आपल्या डोक्यातून लगेच चालले जाते.सकाळी उठल्यानंतर अशी स्वप्ने लक्षात नाही येत आणि आपण आपला दिवस चांगला शांत मनाने सुरु करू शकता.
  • स्वप्न शास्त्रानुसार असे मानले जाते की माणसाला त्याच्या कर्मांनुसार चांगली किंवा वाईट स्वप्ने असतात.परंतु ब्राह्मणांची सेवा केल्याने आपल्या कर्मातून मुक्ती मिळते आणि स्वप्नातील दोषही नष्ट होतात. योग्य आणी पात्र ब्राह्मणांची पूजा करून दान देऊनही स्वप्नांचा त्रास टाळता येतो.

  • शास्त्रानुसार घरी वास्तु दोष असल्यामुळे स्वप्नातील दोष व वाईट भीतीदायक स्वप्नेसुद्धा दिसतात. वास्तविक, आपल्या घराभोवती राहणारी नकारात्मक उर्जा अशा अशुभ स्वप्नांना जन्म देते.घराच्या शांतता आणि आनंदासाठी नकारात्मक उर्जा घरापासून दूर ठेवणे खूप महत्वाचे आहे. घराची वास्तुची रचना वास्तूशास्त्रानुसार निश्चित करावी आणि घरात हवन करावे.
  • धर्मग्रंथानुसार सूर्य देवाची नियमित उपासना केल्यास अशी स्वप्न पडत नाहीत.सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाला पाणी द्यावे,असे म्हणतात की जेव्हा आपण सूर्याला पाणी अर्पण करत असतो त्यावेळी त्यातील पाण्याचा थेंब आपल्या शरीरावर पडल्याने ते आपले शरीर व मन शुद्ध करतात.
  • धर्मग्रंथानुसार वाईट स्वप्न त्याच वेळी विसरले पाहिजेत, याचा उल्लेख कोणासही करता कामा नये. असे केल्याने माणूस पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीबद्दल विचार करत राहतो. असे न केल्याने स्वप्नातली घटना त्याच्या मनातून निघत नाही आणि माणूस त्या स्वप्नाची पुन्हा पुन्हा आठवण करत राहतो आणी त्याचा त्याला नेहमी ताण येत राहतो.

  • धर्मग्रंथानुसार सकाळी उठल्याबरोबर आपण आंघोळ करण्याचे महत्त्व सांगितलं आहे. आंघोळ केल्याने आपल्या शारीरिक आणि मानसिक दोन्ही पद्धतीनं शुद्ध होतो.वाईट स्वप्न दूर सारण्यासाठी मनुष्याला मानसिक रुपानं शुद्ध असणं खूप गरजेचं असतं. आंघोळ केल्यानं ते थांबू शकतं. ज्या व्यक्तीला नेहमी वाईट स्वप्न पडतात, त्या लोकांनी रोज सकाळी उठल्याबरोबर आणि रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करायला पाहिजे.
  • ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवांना त्रिदेव म्हटलं जातं. या त्रिदेवांची जर आपण दररोज पूजा केली तर आपल्या मनातील वाईट विचार नकारात्मक विचार नाहीसे होतात..

 

 

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट