नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात आपल्या स्वतःचे घर असावे असे स्वप्न असते, आपल्या स्वतःच्या मालकीचे हक्काचे घर असावे असे सर्वानाच वाटते. आणि मग आपण एखादी जागा पाहून त्या ठिकाणी प्लॉट करतो नवीन घरात, नवीन फ्लॅट मध्ये राहायला जातो मात्र तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी सुख काही लाभत नाही सतत कोणी ना कोणी आजारी पडते.
वादविवाद होतात कामामध्ये यश येत नाही. जे उद्योगधंदा चालला होता ते नवीन जागी राहायला गेल्यानंतर बंद पडते. त्या ठिकाणी तोटा होऊ लागते, अश्या वेळी अनेकांना काय करावे असा प्रश्न पडतो. आणि काय करावे ते सुचत नाही कारण घरे उभा करण्यासाठी प्रचंड पैसा खर्च केलेला असतो. बांधकाम करण्यासाठी प्रचंड पैसा खर्च झालेला असतो अगदी हिकडे आड आणि तिकडे विहीर अशी आपली परिस्थिती होऊन जाते.
अश्यावेळी वास्तुशास्त्रातील काही उपाय आपल्या मदतीला येऊ शकते. आपल्या वास्तूत काही वास्तूदोष असतील ज्या वास्तूत सुख लाभत नाही अशी वास्तू वास्तुदोषास पात्र असते, आणि हेच वास्तुदोष जाण्यासाठी घरातील जी करती व्यक्ती आहे मग ती पुरुष असो किंवा स्त्री त्या व्यक्तीने एका मंत्राचा जप करायचा आहे. दररोज अंघोळ केल्यानंतर कमीत कमी ११ वेळा, २१ वेळा अश्या पदतीने आपण ह्या मंत्राचा जप आपण सलग सहा महिने केला तर विश्वास ठेवा कि आपली वास्तुदोषातून मुक्तता नक्की होते.
घरातील कर्ता पुरुष किंवा कर्ती स्त्री म्हणजेच घरातील कमावती व्यक्ती ज्यावर सर्व कुटुंबाचे उदरनिर्वाह चालू आहे अशी व्यक्ती ह्याने हा उपाय करायचा आहे. पण मात्र हा जप आपण सलग सहा महिने करा त्यात बदल किंवा खंड पडू देऊ नका. जास्तीत जास्त १०८ वेळा आपण ह्या मंत्राचा दररोज जप करायचा आहे आणि जप करण्यासाठी आपण कोणत्याही माळेचा वापर करू शकता.
मंत्र आहे अपसर्पन्तु ते भूता, ये भूता भूमिसंस्थिता । ये भूता विघ्नकर्तारस्ते नाश्यन्तु शिवाज्ञया ।। ह्या मंत्राचे उच्चारण करत असताना घरामध्ये नेहमी चांगलेच बोला कोणालाही घरात दूषणे देऊ नका, नेहमी चांगले बोला. आपली जी काही कुलदैवत आहे त्या देवतेचे घरात त्यांचे आपण दररोज पूजन करा. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.