घरगुती उपाय

पित्ताचा त्रास काय आहे ते ज्याला त्रास आहे त्यांनाच कळतो, म्हणूनच त्यावर काही घरगुती उपाय जाणूनन घ्या नक्कीच फरक जाणवेल.

तुम्हाला देखील जर दोन दिवसांनी ऍसिडिटी चा त्रास होतो का ? काही खाल्ले कि पचन होत नाही सारखे पित्ताचा त्रास होतो असे सर्व होत असेल तर आजचा लेख खास तुमच्याकरिता आहे. अपुरी झोप तणावग्रस्त जीवनशैली, चरबट फास्ट फूड खाणे अश्या अनेक कारणांनी पित्ताचे दोष निर्माण होतात ज्यालच ऍसिडिटी असे म्हणतात. तीव्र डोकेदुखी,छातीत जळजळ, उलट्या होणे अस्वस्थ वाटणे अशी पित्ताची लक्षणे आहेत ह्यावरच काही सोपे उपाय तुम्ही अगदी घराच्या घरी करू शकता व तुमची ऍसिडिटी गायब करू शकता. चला तर जाणून घेऊयात काही उपाय.

मित्रांनो केळी खाणे, केळी खाल्याने शरीराला उच्च प्रतीचा पोटॅशिअम चा पुरवठा होतो. त्यामुळे पोटात आम्लनिर्मितीची प्रक्रिया मंदावते. तसेच ह्यातील फायबर्स मुळे शरीराची पचनक्रिया सुलभ करते. फळांमध्ये काही विशिष्ट असे घटक असतात ज्याच्या घटकांमुळे आम्लाचा विघातक परिणांपासून संरक्षण होते. पित्त झाल्यावर एक पिकलेले केळ नक्की खा ह्यामुळे अराम तर नक्कीच मिळेल शिवाय दररोज एक केळ खाण्याची सवय नक्की ठेवा ह्याने खूप फायदे मिळतात.

तुळस, हि तर अगदी सगळ्यांच्या घरात असते. तुळशीमध्ये अँटिअल्सर घटक पोटातील तयार होणारे विषारी घटकांपासून बचाव करते. तुम्हाला पित्ताचा त्रास जाणवत असेल किंवा अस्वस्थ वाटत असेल तर चार ते पाच तुळसीची पाने चांगली धुवून घ्या व ती चावून खा ह्यामुळे तुम्हाला चांगला फरक दिसून येईल.

ह्यानंतर आहे ते म्हणजे दूध, दुधातील कॅल्शिअम मूळे पोटातील तयार होणारी अम्लाची निर्मिती थांबते. थंड दूध प्याल्याने पोटातील पित्तामुळे आणि छातीतील जळजळ थांबते. दूध हे पित्तशामक असून त्यात साखर किंवा आणखी काही न टाकता प्यावे. मात्र तर त्यात तुम्ही साजूक तूप जर त्यात घालून प्याला तर तुम्हाला त्याचा डबल फायदा मिळणार आहे.

बडीशेप, बडीशेप मुळे अँटीअल्सर घटक पचन सुधारते व बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करते. बडीशोप मुळे पोटात थंडावा निर्माण होतो, म्हणून छातीतील जळजळ कमी होते. तुम्ही जर बडीशोप तोंडात टाकून नुसती चघळली तरी पित्ताची जी काही लक्षणे आहेत ती दूर होतात. तसेच पित्तामुळे अस्वस्थ वाटत असेल तर बडीशोप आपण पाण्यात उकळून रात्रभर ते पाणी तसेच ठेवा आणि मग ते पाणी आपण उपाशी पोटी प्याल्याने आपल्याला अराम लगेच मिळतो. शिवाय तुमचा दररोजचा ऍसिडिटी चा त्रास असेल तर तो कमी होईल.

आवळा, तुरट आंबट चवीचा आवळा पित्तनाशक असून त्यातील व्हिटॅमिन सि हे अन्ननलिका पोट स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करते. रोज चमचाभर आवळ्याची पावडर किंवा मार्केट मध्ये मिळते ते आवळा चूर्ण ते जरी आपण घेतल्यास आपला पित्ताचा त्रास कमी होतो. जर तुम्ही दररोज आवळा रस जरी पाण्यात मिक्स करून पिला तरी चालतो. रोज सकाळी उपाशीपोटी मात्र हे घ्यावे म्हणजे आपल्याला लगेच फरक पडतो.

तर आजच्या लेखात आपण पहिले कि रोज वातावरणातील बदलाव असूद्यात किंवा जीवनशैलीतील बदल असतील, ज्यांना काहीहि खाल्ले तर त्यांना ऍसिडिटी चा त्रास होतो त्यांच्यासाठी अगदी झटपट असे उपाय तुम्ही घराच्या घरी करू शकता असे काही उपाय आपण पहिले. तर आजचे उपाय इतरांना देखील सांगण्यासाठी आजचा आमचा लेख नक्की शेयर करा.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट