धार्मिक

अमावस्याला करा हे उपाय समस्या सर्व सुटतील.

आज शनिवारी आमावस्या प्रारंभ होत आहे आणि उद्या रविवारी हि अमावस्या संपनार आहे . या दोन्ही दिवशी अमावस्या असणार आहे. जरी शनिवारी संघ्याकाळी हि अमावस्या सुरु झाली तरी रविवारी हि पूर्ण दिवस असणार आहे. हि जी अमावस्या आहे हि दर्श अमावस्या म्हणून ओळखली जाते. आणि लगीच दुसऱ्या दिवशी श्रावण महिना सुरु होणार आहे. आपण सर्व जण हा महिना आध्यत्मिक म्हणून मानला जातो.

मित्रांनो हि जी अमावस्या आहे हि दोन दिवस असणार आहे. त्यामुळे या दिवशी काही उपाय किंवा सेवा नक्की करावी यामुळे आपल्या त्याचा नक्की फायदा होईल. आपल्याला येणाऱ्या अडचणी नक्की दूर होतील. आजच्या दिवशी घराचा उंबरठा हळदीने सारवून घ्यावा. त्याचा बरोबर पाण्यात लिबू, मीठ , हळद आणि गोमूत्र हे सर्व एकत्र करून आपली वाहने किंवा यंत्रे स्वच्छ करून घ्यावी. त्या नंतर सात वेळा नारळ ओवाळून ते फोडून फेकून देणे. सोमवार असेल तर नारळ फोडूनये.

अमावस्या दिवशी काही विशेष सेवा कराव्यात त्या कोणत्या ते पाहू. या दिवशी सकाळी उठल्यावर अंघोळ करायच्या आधी शरीराला तेल लावून, अंघोळ करतांना गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र बोलत रहावे. आपल्या उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन अकरा वेळा कालभैरवकष्टक त्यानतंर अकरा वेळा वेदोक्त ” वल्गा सूक्त ” झाल्यावर घरात हि मोहरी टाकायची आहे. यामुळे घराची वाईट सक्ती, करणी आणि इतर सर्व गोष्टी कमी होते.

त्याच बरोबर आपल्या घराच्या जवळ असलेल्या मंदिरात जाऊन सर्व देवी देवतांचे हार आणि खडीसाखर ठेऊन मानसन्मान करावे. काहीच जमत नसेल तर अमावस्या दिवशी मंदिरात जाऊन नारळ नक्की फोडावे. हळद आणि गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसून घ्यावा.

अमावस्या दिवशी नारळ, कोहळे किंवा गोरक्षचिंच आणल्यावर. त्यावर श्री स्वामी समर्थ मंत्र, श्री दत्त महाराज बीज मंत्र आणि शाबरी मंत्र एक माळ म्हणावे आणि नवनाथ मंत्र , कालभैरवकष्टक मंत्र आणि वल्गासूक्त अकरा वेळा म्हणावे. हे झल्यावर नारळ, कोहळी किंवा गोरक्षचिंच हे एका पुडीत बांधावे जर तुम्ही असे अगोदर केले असेल तर ते वाहत्या पाण्यात सोडून द्यावे. आणि हा उपाय सूर्यस्त झल्यावर हा उपाय करावा .

आपल्या घरात शांतता रहण्यासाठी एक सोललेला नारळ घेऊन त्याची शेंडी देवाकडे करून त्या वर रोज सकाळ आणि संध्यकाळ सात कापूर वड्या जळाव्यात हे करत असतानां श्री स्वामी समर्थ जप आणि गायत्री मंत्र जप करावा. दर अमावस्या आणि पौर्णिमा च्या दिवशी नारळ बदलावे जुने नारळ फोडून त्याचा प्रसाद घरात सर्वाना द्यावा जर नारळ खराब निघाले तर ते विसर्जित करावे.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट