वास्तू शास्त्र

घरात पैसा कधीच कमी पडणार नाही. या दिशेला पाण्याचा माठ ठेवल्यास.

पाणी पिण्याचा माठ जर का योग्य दिशेला ठेवल्यास घरात कधीच पैशांची कर्मतारा जाणवणार नाही. त्याच सोबत पाणी पिण्याचा माठ योग्य दिशेला व योग्य कोपऱ्यात ठेवल्यास घरातील वास्तूदोष सुद्धा नाहीसे होतात. त्याच बरोबर जर का माठा मधील पाणी पिल्यास आपले आरोग्य सुद्धा चांगले राहण्यास मदत होते. यासर्व गोष्टी साठी आपण माठ घरात कधी खरेदी करून आणावा आणि घरात कोणत्या कोपऱ्यात माठ ठेवावा. याबद्दल जाणून घेऊ.

उन्हाळा सुरुझाला कि सर्व जण नवीन माठ खरेदी करतात कारण थंडगार पाणी पिण्यासाठी. सध्याच्या युगात फ्रिज किंवा वॉटर कुलर असल्यामुळे शक्यतो माठ कोणी खरेदी कोणी करत नाही. पण मित्रांनो माठातील थंडगार पाणी पिण्याची मजा वेगळीच असते. बऱ्याच लोकांना प्रश्न येत असतो की माठ खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त कोणता तर कोणत्याही सोमवारी चांगला दिवस पाहून आपण माठ खरेदी करून अनु शकतो.

ज्या दिवशी आपण खरेदी करून आणतो त्याच दिवशी हा वापरला जात नाही. समोवारी खरेदी करून आणल्यानंतर माठ संपूर्ण दिवशी भरून ठेवावा रात्री त्याची पूजा करून पिण्याच्या पाण्याने भरून ठेवावा. पण घरात पाण्याने भरलेला माठ योग्य दिशेला ठेवल्यास त्याचे चांगले परिणाम आपल्याला दिसून येतात. त्याच सोबत घरातील बरेच दोष सुद्धा कमी होतात.

वास्तुशास्त्रा नुसार पिण्याचा पाण्याने भरलेले भांडे जर का ईशान्य किंवा उत्तर दिशेला ठेवल्यास त्याचे लाभ आपल्या घरावर चांगले दिसून येतात. तसेच घरात सकारात्मकता चांगली दिसुन येते. त्याच सोबत जर का घरात पैशाची कमतरता जाणूनये असे वाटत असेल तर हा माठ कधीच रिकामा ठेऊन नका कमीत कमी अर्ध्या पेक्षा जास्त नेहमी भरलेला राहील याची काळजी घ्या.

बऱ्याच वेळेस असे होते कि आपण नवीन माठ घरी घेऊन येतो आणि त्याच उपयोग सुरु करतो आणि काही दिवसात यामाठाला तडा जातो आणि बऱ्याच वाईट गोष्टी आपल्या कानावर पडतील असे वाट असते. जर का वारंवार माठाला तडे जात असेल तर घरात वास्तुदोष असण्याची शक्यता असते. तसेच बरेच लोकं माठ बदलतात आणि जुना माठ हा फोडतात असे करू नका. त्याचा उपाय हा बागेत किंवा इतर ठिकाणी कुंडी म्हणून सुद्धा उयोग करू शकतात.

तसेच जर का आपल्याला घरातील उत्तर आणि ईशान्य दिशेला माठ ठेवायला जागा नसेल तर इतर दिसेल सुद्धा आपण माठ ठेऊ शकतो. पण ज्या ठिकाणी आपण गॅस, किंवा चूल पेटवतो म्हणजेच का तर ज्या ठिकाणी आपण ज्वाला प्रजवळीत करतो अशा ठिकाणी पाण्यानी भरलेला माठ ठेऊनये. यामुळे घरातील लक्ष्मी बाहेर जाऊ शकते. म्हणजेच काय तर आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात.

दक्षिण दिशेला माठ कधीही ठेऊ नका कारण हि दिशा नकारात्मक दिशा आहे. जर आपण यादिशेला माठ ठेवल्यास त्या पाण्यात सुद्धा नकारात्मकता येऊ शकते. असे पाणी आपण पिल्यास आपल्या घरात सारखे वादविवाद होण्याची शक्यता असते. जर का ईशान्य किंवा उत्तर दिशेला जमत नसेल माठ ठेवायला तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला माठ ठेवला तरी चालतो.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट