The last words from the mouth of Shri Swami Samarth
धार्मिक

शेवटचे शब्द श्री स्वामी समर्थांच्या मुखातून निघालेले निर्वाणा पूर्वी.

श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ. श्री समर्थानी आपल्या पुढील कार्याचे निययोजन आधीच ठरवले होते. स्वामी महाराजर आपल्या भक्तांना आपल्या बद्दलची सर्व माहिती देत होते. तसेच स्वामींचे भक्त श्री चोळप्पा यांचे निर्वाणा झाल्यावर स्वामी महराजांनी आपल्या सर्व पुढील कामाचे नियोजन करून ठेवण्यास सुरवात केली होती.

काही दिवसानी स्वामी महाराजाना अधूनमधून ताप येत होता. त्यामुळे त्यांना त्रास होत होता. तसेच त्याचा खाण्या मध्ये बराच फरक पडला. पण स्वामी महाराजच्या बोलण्यात आणि इतर कामात ते अजून सुद्धा रुबादार होते. जर का कोणत्या भक्ताने त्यांना एखादी गोष्ट करण्यास मनाई केल्यास त्या भक्तावर ते क्रोध करत असत. स्वामी भक्त त्यांना अराम करा असे बोलण्या आधीच स्वामी त्यांच्यावर चिडून बोलत असे.

काही भक्त स्वामीना अराम मिळावा म्हणून बिछानाची तयारी करत होते. त्यावेळेस स्वामी म्हणत असे आम्हला अराम करायचा नाही.सोलापूर वरून वैद्य आले होते त्यांची नाडी तपासण्यासाठी. त्यावेळीस स्वामींना क्रोध आला होतात. आणि स्वामी महाराज त्या वैद्यस म्हणाले जा तू याठिकाणावरून. तसे पाहिल्यास स्वामींना काही त्रास होत असेल असे काही वाटत नव्हते.

स्वामी महराजांनी सर्व प्रमुख व्यक्तीकडून बऱ्याच प्रमाण चांगले काम करून घेतले होते. तसेच काही प्रतिष्टीत व्यक्ती कडून दान धर्म करून घेतले होते. स्वामी महाराजांची निजधामाची वेळ जवळ येत होती. चैत्र वैद्य त्रयोदशीच्या दिवशी मंगळावर रोजी काही तरी वाईट घडेल असे कोणाला वाटले सुद्धा नव्हते. स्वामींनी सर्व सेवेकरांना आणि भक्तांना सांगितले कि सर्व जनावरे घेऊन या.

सर्व सेवेकरांना आपल्या जवळील गायी, बैल आणि वासरू स्वामींच्या दर्शना साठी घेऊन आले होते. स्वामींनी स्वतःच्या हातांनी सर्व मुक्या प्राण्यांना अन्न खाऊ घातले. तसेच आपल्या जवळ असलेले कपडे सर्व प्राण्यांना घातले. मुक्या जनवराना माणसाच्या आधी वाईट गोष्टी समजतात असे म्हंटले जाते. त्याच प्रमाणे स्वामींनी सर्व जनावरांच्या पाठीवरून हात फिरवला आणि त्यांच्या डोळ्यात पाणी येण्यास सुरवात झाली.

स्वामी महाराज आपल्या रोजच्या पलंगावर जाऊन बसले आणि आपल्या सेवकरला आपल्या पाठीमागे लोड ठेवण्यास संगितले. आणि थोड्याच वेळात स्वामींनी आपले डोळे बंद केले. तिथे आलेल्या वैद्याने स्वामींची नाडी तपासली आणि त्याना नाडी सापडली नाही. आणि सर्वांवर दुःखांचा डोंगर कोसळा पण थोड्याच वेळानी स्वामींनी एक लीला दाखवली.

स्वामींनी डोळे उघडले आणि सर्वना एक मंत्र दिला. ” जो व्यक्ती माझी मनापसून भक्ती करेल त्याच्या पाठीशी मी सतत उभा राहील.” हे सांगून स्वामींनी आपले डोळे पुन्हा बंद केले. सर्व भक्तांना एकच अशा होती कि स्वामी महाराज पुन्हा डोळे उघडतील पण तसे झाले नाही. श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट